आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या घटनात्मक इतिहासात प्रथमच ट्रिपल तलाकला केंद्राचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या घटनात्मक इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने तिहेरी तलाक, निकाह हलाला व मुस्लिमांतील बहुपत्नीत्व पद्धतीला विरोध केला. याऐवजी लैंगिक समानता व धर्मनिरपेक्षता आधारित पुनर्विचाराची गरज प्रतिपादित केली.

भारतात महिलांना घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे तिहेरी तलाक धर्माच्या आधारे वैध नाही, असे कायदा व न्याय मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकुलिता विजयवर्गीय यांनी हे शपथपत्र दाखल केले आहे. देशातील महिलांच्या हक्कांची जपणूक करताना केवळ महिलांच्या इच्छा-आकांक्षांची जपणूक म्हणून नव्हे तर समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सरकारने शपथपत्रात नमूद केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...