आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची लोकपालसह १६ विधेयके केंद्राने फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिल्लीची लोकपालसह १६ विधेयके फेटाळून लावली आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी ब्रेक्झिटच्या धर्तीवर सार्वमत घेण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली.

दिल्ली सरकारने लोकपालच्या विधेयकाला मंजुरी दिली असली तरी त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे. त्यासोबतच इतर विविध १५ प्रस्तावांनाही परत करण्यात आले आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या योजनांना धक्का बसला आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणीही केजरीवाल यांच्या पक्षाने चांगलीच लावून धरली आहे. त्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे. तो सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यावर जनतेकडून मते मागवण्यात आली आहेत. ३० जूनपर्यंत मते मागवली जाणार आहेत. ब्रिटनमधील सार्वमत घेण्यात आल्यानंतर दिल्लीतही सार्वमत घेतले जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यास पोलिस, जमीन, महापालिका, नोकरशहा दिल्ली सरकारच्या नियंत्रणाखाली येईल. लोकशाहीत लोक हेच सर्वोच्च असतात. स्वतंत्र राज्यासाठी सार्वमत घेणे योग्य ठरेल, असे आप नेते आशिष खेतान यांनी म्हटले आहे.
...तर सिद्ध केल्यास गिरी राजीनामा देतील : भाजप
महापालिका अधिकारी एम. एम. खान यांच्या हत्येच्या प्रकरणात नायब राज्यपाल नजीब जंग यांना पत्र लिहिल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले आहे. ते सिद्ध झाल्यास खासदार महेश गिरी आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...