आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेलची लिंक शेअर केली तर साेशल मीडियावर कारवाई, केंद्राचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्ल्यू व्हेलवर बंदी अाणल्यानंतर सरकारने त्याच्या लिंक हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. इंटरनेटवरील सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सला अशा सर्व लिंक हटवण्यास सांगितले आहे. जर अशी लिंक शेअर झाली तर सोशल मीडिया वेबसाइट्सवर कारवाई केली जाईल.
 
या ऑनलाइन गेमच्या संशयास्पद लिंक ओळखण्यासाठी विविध सोशल मीडियांची डाटाबँकही तयार केली जात आहे. लिंकवरून हा गेम कसा उपलब्ध होत आहे, याची यातून ओळख पटेल.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॉट्सअॅप, फेसबुक गुगलसारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सांगितले गेले आहे की, यासाठी त्यांनी आपला एक अधिकारी नियुक्त करावा. यामुळे संशयित लिंकची ओळख पटवून त्यावर सर्व वेबसाइटवर एकाच वेळी बंदी आणता येईल.

केरळात आत्महत्येचे प्रकरण
केरळात ब्ल्यू व्हेलमुळे आत्महत्यचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कन्नूरमध्ये २२ वर्षांच्या सावंत नावाच्या मुलाने गेल्या महिन्यात आत्महत्या केली. त्याच्या आईने सांगितले की, सावंतच्या हातावर अनेक ठिकाणी ब्लेडच्या जखमा होत्या.
 
बातम्या आणखी आहेत...