आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centrel Information Commission Reject Perarivalan Application

राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारिवलनचा माहिती अर्ज केंद्रीय म‍ाहिती आयोगाने फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दया याचिका फेटाळण्याच्या कारणांचा अहवाल माहिती अधिकारात देण्याची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी एजी पेरारिवलन याची याचिका केंद्रीय माहिती आयोगाने फेटाळून लावली आहे.


पेरारिवलनला राजीव गांधी यांच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा झाली आहे. शिक्षेबाबत त्याची दया याचिका राष्‍ट्रपतींनी फेटाळून लावली होती. याचिका फेटाळण्याच्या कारणांचा अहवाल देण्यात यावा, अशी मागणी पेरारिवलनने केली होती. तत्कालीन राष्‍ट्रपती के. आर. नारायणन आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यादरम्यानचा संवाद सार्वजनिक करण्यासंदर्भात माहिती अधिकाराचा अर्ज करण्यात आला होता; परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावर प्रतिबंध लावले होते. माहिती अधिकार हे संविधानाच्या तरतुदीपेक्षा श्रेष्ठ नसल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. या निर्णयाचा हवाला देत गृह मंत्रालयाने पेरारिवलन याची याचिका फेटाळून लावली आहे.