आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाबाहार बंदर लवकरच कार्यान्वित होणार : गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराणमधील चाबाहार बंदर लवकरच कार्यान्वित होणार आहे. भारत, इराण व अफगाणिस्तानसाठी हा प्रकल्प विकासाचे नवे द्वार ठरेल. प्रादेशिक पातळीवरील संपर्क व व्यापाराला त्यामुळे गती येईल, असे जहाज व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

बंदराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया नुकतीच संपली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम आता वेगाने पूर्ण करण्यात येईल. प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल. नवीन गुंतवणुकीतून नवीन संधी कशा मिळू शकतील, याचा शोध सरकार म्हणून सातत्याने घेतला जात आहे. इराणमधील हा प्रकल्पही त्याचाच भाग आहे. चाबाहार बंदराच्या माध्यमातून सागरी वाहतुकीच्या दृष्टीने सुलभता येणार आहे. भारताच्या विकासालादेखील त्यामुळे गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इराण व अफगाणी शिष्टमंडळासोबत गुरुवारच्या बैठकीनंतर गडकरी बोलत होते. बैठकीला इराणचे समकक्ष अब्बास अखौंदी व अफगाणिस्तानचे वाहतूक मंत्री मोहमदुल्ला बाताश यांची उपस्थिती होती.
मोदींचे लक्ष
पंतप्रधान मोदी व अशरफ घनी यांच्यात झालेल्या चर्चेच्या पंधरा दिवसानंतर गडकरी यांच्या उपस्थितीत तीन देशांची चर्चा झाली आहे. मोदी यांना या प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हे बंदर विकसित झाल्यानंतर कांडला-चाबाहार हे अंतर दिल्ली-मुंबईपेक्षाही कमी होईल. त्याचबरोबर संधीच संधी निर्माण होतील. चाबाहार प्रकल्पाकडे मोदींचे वैयक्तिक लक्ष आहे.
त्रिपक्षीय कराराचे फायदे
{इराणच्या गॅस-पेट्रोलियम पदार्थांची सहज उपलब्धता.
{अफगाणिस्तानची बाजारपेठ भारतासाठी खुली.
{अफगाणिस्तानमधील वस्तू भारतात उपलब्ध.
{त्रिदेशीय व्यापार-संधींची उपलब्धता.
{तीनही देशांतील करारानुसार रस्ते, रेल्वेचाही विकास.
बातम्या आणखी आहेत...