आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचा चौधरी COMICS: जेव्हा 'साबू'ने नाही, तर चाचीनेच धोपाटले चोरांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्राण यांनी बनवलेले काही मजेदार कॉमिक्स)

नवी दिल्ली - दिल्लीतील एका वृत्तपत्रासाठी आपले पहिले कॉमिक्स बनवणारे प्राण यांचे बुधवारी निधन झाले. प्राण असे व्यक्ती होते की, ज्यांनी चाचा चौधरी, साबू, बिल्लू आणि श्रीमतीजी यांसारख्या पात्रांना नवे जीवन दिले आणि घराघरात पोहोचवले.

लाहोरमध्ये जन्मलेल्या आणि मध्यप्रदेशमध्ये शिकलेल्या प्राण कुमार शर्मा यांना एका वर्षांपासून कर्करोगाचा आजार होता. बुधवारी सकाळी त्यांची या आजारामुळेच प्राणज्योत मालवली. 60 च्या दशकात प्राण यांनी दिल्लीच्या 'मिलाप' या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली. तेव्हा परदेशी कार्टून मेंड्रेक आणि ब्लॉडी यांची सर्वत्र चलती होती. प्राणने यांच्या विरोधात ठेंगण्या - टकला अशा भारतीय सुपरमॅन चाचा चौधरीला जन्म दिला. त्या दरम्यानच त्यांनी चाचा चौधरीची सिरीज सुरू केली. 1969 जेव्हा कोणालाही कॉम्प्यूटरचा 'क' माहित नव्हता अशा वेळी 'लोटपोट' या मासिकातील काँम्प्यूटरपेक्षा वेगाने चालणारी बूध्दी, हातात काठी आणि डोक्यावर फेटा असे रुप असलेला चाचा चौधरी खुपच प्रसिध्द झाला. काही वेळानंतर चाचा चौधरी यांच्यासोबत साबू आला आणि नंतर रॉकेटही आले. या तीघांच्या जोडीने अनेक दशके घराघरामध्ये हास्याचे फवारे उडवले.
10 भाषांमध्ये 500 पेक्षा जास्त कॉमिक्स लिहिल्या.
प्राण यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी 10 भाषांमध्ये 500 पेक्षा जास्त कॉमिक्स लिहिल्या. यासाठी त्यांनी दोन लाखांपेक्षाही जास्त कॉर्टून्स बनवले. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना एकाने तर मायकल जॅक्सनपेक्षा जास्त प्रसिध्द व्यक्ती असे संबोधले होते.

जन्म : 15 ऑगस्ट 1938
मृत्यु : 06 ऑगस्ट 2014
पुढील स्लाईडवर पाहा, व्यंगचित्रकार प्राण यांनी बनवलेले काही मजेदार कॉमिक्स...