आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अगतिक’ भुजबळांचे शक्तिप्रदर्शन! समीरची अटक, पंकजच्या चाैकशीने वाढली धास्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - अार्थिक गैरव्यवहारांचा आरोप असलेले माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी अमेरिकेहून मुंबईच्या विमानतळावर परतताच जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पण या ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांची अगतिकताही िदसून आली. पुतण्या समीर तसेच मुलगा पंकज यांच्या ईडीच्या चौकशीने ते काहीसे धास्तावलेले िदसले. पांढरा सदरा झब्बा घातलेले तसेच गळ्यात लाल मफलर घातलेले भुजबळांनी सुरुवातीला थोडेसे हसत प्रसार माध्यमांशी संवाद साधला खरा, पण त्याचा सूर सौम्य लागला होता. नेहमीसारखे आक्रमक भुजबळ िदसले नाहीत.

अमेरिकेतील काँग्रेस परिषदेत सहभागी होऊन भुजबळ मंगळवारी दुपारी मुंबईत परतले. यावेळी िवमातळावर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ‘भुजबळ आगे बढो...’ अशा घोषणा देत समर्थकांनी भुजबळांना उघड्या जीपमध्ये बसवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास सांिगतले. भुजबळांनीही मग हाती माईक घेऊन समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला िदला. ‘मी व माझे कुटुंिबय निर्दोष असून यामधून आपण लवकरच बाहेर पडू’, असा िवश्वास त्यांनी बाेलून दाखवताच समर्थकांमध्ये जल्लोष पसरला. त्यानंतर विमानतळावरून भुजबळांनी थेट राष्ट्रवादी भवन गाठले व तिथे पत्रकार परिषद घेतली. आपल्यावरील आरोप खोडून काढताना राज्य सरकार जाणीवपूर्वक ही कारवाई करत असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच अापल्या पाठीशी उभे राहणारे पक्षाध्यक्ष शरद पवार व कार्यकर्त्यांचा अापण अाभारी असल्याचे त्यांनी सांगितले. इतर पक्षांमधील िहंतचिंतकानीही आपल्याला पाठिंबा िदल्याचे सांगत त्यांनी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे खासदार िकरीट सोमय्या यांच्यावर नेहमीप्रमाणे आक्रमक हल्ला करण्याएेवजी भुजबळ काहीसे भावूक झालेले िदसले. ‘सोमय्या यांच्या मुलाला काही िदवसांपूर्वी अपघात झाला होता. तो अपघात होता का आणखी काही प्रकार होता, हे मला माहित नाही. पण, एका बापाचे दु:ख काय असते, हे सोमय्या यांना तेव्हा समजले असेल,’ असे भुजबळ म्हणाले.
अापला मुलगा पंकजची ईडीकडून
मंगळवारी कसून चौकशी झाल्यामुळे भुजबळ काहीसे अस्वस्थ असल्याचे िदसत होते. शिवाय लवकरच समीर व पंकज यांना समोरासमोर बसवून ईडीकडून चौकशी केली जाणार असल्यामुळे भुजबळांच्या काळजीत भर पडली आहे.
शिवसेना मंत्र्यांना ‘काळजी’
मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यंानी भुजबळांवरील कारवाईविषयी मुख्यमंत्र्यांना िवचारणा केली. या िवचारणेत आपल्या जुन्या नेत्यांिवषयी काळजीचा सूर या मंत्र्यांमध्ये िदसला. मात्र हा काही कॅबिनेटचा िवषय होत नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जास्त बाेलणे टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही गोष्टी पडद्यामागेच बऱ्या
दुसऱ्या पक्षांमधील िहंतचिंतकांनीही आपली िवचारपूस केली, असे भुजबळ म्हणाले. त्यावर ‘शिवसेनेकडून तुमच्याविषयी काळजी व्यक्त करण्यात आली आहे का?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ‘काही गोष्टी पडद्यामागेच राहिलेल्या बऱ्या. आताच सांगून काय फायदा?’ असे मिश्कील उत्तर भुजबळांनी दिले.
पुढील स्लाइडमध्ये,
>> राष्ट्रवादीच्या नेत्यांची शक्तिप्रदर्शनाकडे पाठ
>> पंकज भुजबळांची आठ तास चौकशी
>> अामच्यावर कारवाईसाठी तपास यंत्रणांवर दबाव