आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chai Pe Charcha News In Marathi, Narendra Modi, Rahul Gandhi

‘चाय पे चर्चा’ला उत्तर हँगआऊटचे; राहुल यांचा दावा, सर्वेक्षण म्हणजे थोतांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा सुरू केल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हँगआऊट सुरू केले आहे. शनिवारी त्यांनी ‘गुगल हँगआऊट’वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्ते व जनतेशी एक तास थेट संवाद साधला.

जनमत सर्वेक्षणाशी संबंधित प्रश्नावर राहुल म्हणाले, सर्वेक्षणात काँग्रेसला 100 जागा मिळतील, असे दर्शवणे ही थट्टाच आहे, हे आपण (कार्यकर्त्यांनी) समजून घेतले पाहिजे. तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकू. काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी हे डावपेच सुरू आहेत. सन 2004 मध्ये सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसच्या जागा घटणार, असे दाखवले जात होते; पण काँग्रेसने निवडणूक जिंकली. 2009 मध्येही प्रत्येक सर्वेक्षणात काँग्रेस हरणार असेच चित्र होते; परंतु आमच्या जागा दुप्पट झाल्या. 2009 मध्ये आम्ही विरोधकांना मनरेगाच्या साथीने हरवले. यंदा अन्न सुरक्षा कायद्याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करू. आम्ही तिसरी निवडणूक लढवत आहोत. प्रत्येक वेळी काँग्रेसची कामगिरी खालावणार, असेच सांगितले जाते; पण ते भाकीत म्हणजे आपण काळ्या दगडावरची रेघ समजू नये. आपल्याला एकजुटीने निवडणूक लढवावी लागेल, असे ते म्हणाले.

तिरकस प्रश्नांना बगल
प्रश्न : जातीयवादी शक्तींशी लढण्यासाठी काँग्रेसची काय रणनीती आहे?
राहुल : घाबरण्याची गरज नाही. काँग्रेसच सत्तेवर येणार आहे. भाजप सरकारचा प्रश्नच उद्भवत नाही.
प्रश्न : राज्यांमधील काँग्रेसच्या घटत्या जनाधाराला कसे रोखावे?
राहुल : आपल्याकडे पुष्कळशा संधी आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली होईल. पंजाबमध्ये लोकांना सांगावे लागेल की, भाजप सरकार गुजरातमध्ये शीख लोकांच्या जमिनी हडप करत आहे. तिथे भाजप आणि अकाली दल युती आहे. ही कसली युती?