आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीफ बाळगणे गुन्हा नाही, मुंबई HC आदेशाला महाराष्ट्र सरकारचे सुप्रीम कोर्टात आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. - Divya Marathi
बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते.
नवी दिल्ली- राज्याबाहेर पशूहत्या झाली असल्यास बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली होती. त्यानुसार राज्यात किंवा राज्याबाहेर पशुहत्या झाली तरी बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. 

फक्त राज्यात हत्या करून बीफ जवळ बाळगल्यास तो गुन्हा ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. राज्य सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती आर. के. अगरवाल आणि न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी होणार आहे. बीफवरून देशभरात अनेक ठिकाणी जमावाकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...