आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चना डाळ' ऑक्सफोर्ड डिक्शनेरीत समाविष्ट, 600 पेक्षा अधिक नवीन शब्दांना मिळाले स्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
लंडन / नवी दिल्ली - चना आणि चना डाळ (दाल) या शब्दांना आता ऑक्सफोर्डच्या इंग्रजी शब्दकोषात समाविष्ट करण्यात आले आहे. दर तीन महिन्याला ऑक्सफोर्ड डिक्शनेरीत आधुनिक जीवनशैली आणि चालू घडामोडी पाहता काही नवीन शब्द सामिल केले जातात. यावेळी ऑक्सफोर्ड डिक्शनेरीत 600 पेक्षा अधिक शब्द जोडण्यात आले आहेत. यात फोर्स्ड एरर आणि बेगल यांनाही स्थान मिळाले आहे. 
 
 
- यावेळी ऑक्सफोर्ड शब्दकोषात टेनिसशी संबंधित काही शब्दांना जागा देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने 'फोर्स्ड एरर' (Forced Error) आणि बेगल (Bagel) या शब्दांचा समावेश आहे. 
- टेनिस सामन्यात 6-0 असा स्कोर झाल्यास त्यासाठी बेगल या शब्दाचा वापर केला जातो. ज्यू संस्कृतीमध्ये गोलाकार डोनट ब्रेडला बेगल असे म्हटले जातो. त्याचा आकार शून्यासारखा असल्याने तोच शब्द येथे वापरला जातो. 
 
 
वोक आणि पोस्ट ट्रूथचा समावेश
- यावेळी वोक (Woke) आणि पोस्ट ट्रूथ (Post-Truth) या शब्दांना शब्दकोषात जागा देण्यात आली आहे. 
- 2016 मध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनेरीने 'पोस्ट ट्रुथ'ला वर्ड ऑफ द ईयर घोषित केले होते. तेव्हापासून या शब्दाचा वापर खूप वाढला आहे. तथ्य सोडून केवळ वाद, भावना आणि चर्चांच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीला सत्य मान्य करणे म्हणजेच पोस्ट ट्रूथ होय.
बातम्या आणखी आहेत...