आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगड देशात सर्वांत आनंदी ! जाणून घ्या, कोण असते सर्वात आनंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आनंदीवृत्तीने जगण्यासाठी चंदीगड देशातील सर्वाेत्कृष्ट शहर ठरले आहे. तुम्हाला अगदी मनासारखे जगण्यायोग्य वातावरण येथे आहे. या शहरातील लोकांचे दैनंदिग जगणे व्यग्र असले तरी देखील ते स्वत:साठी, प्रियजनांसाठी उसंत काढतात आनंदी वृत्तीने राहतात.
एका खाजगी कंपनीने नुकताच ‘हॅपीनेस स्टडी’केला. त्यानुसार उत्तर भारतीय लोक देशातील इतर प्रदेशांच्या तुलनेत जास्त आनंदी वृत्ती जोपासतात असे निष्पन्न झाले. आनंदी वृत्तीत देशाची राजधानी तिसऱ्या स्थानी आहे. गुरूवारी हा अहवाल प्रसिद्धी झाला. चंदीगडचे लोक आपल्या शारिरीक तंदुरूस्तीवर अधिक खुश असतात. त्याचबरोबर स्वत:ला आनंद देणारे प्रत्येक काम करण्यास तत्पर असल्याचे दिसून आले. हे संशोधन पीक्यूआर-आयएमआरबी इंटरनॅशनलने केले. दिल्ली तिसऱ्या स्थानी आहे. देशांतील १६ शहरांतील २५०० लोकांकडून नमुना पद्धतीने माहिती संकलीत करण्यात आली. कंपनीच्या उपाध्यक्षा प्रियदर्शनी नरेंद्र यांनी सांगितले.नमुना निवड विविध वयोगटातून करण्यात आली.
कमी उत्पन्न गटातील लोक जास्त आनंदी
धकाधकीच्या जीवनातही प्रत्येक व्यक्तीकडे आनंदी राहण्याचे कौशल्य असणे अत्यावश्यक आहे. हे ध्यानात घेऊनच हे संशोधन केले.कमी उत्पन्न गटातले लोक देशांत जास्त आनंदी वृत्ती जोपासतात. नीलाद्रीदत्ता, शोधकर्ता कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स च्या काॅर्पोरेट मार्केटींग हेड