आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandni Chowk Loksabha Seat Delhi News In Marathi

सर्वात लहान मतदारसंघात 3 दिग्गज; येथे प्रतिष्ठेची तिरंगी लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदणी चौक दिल्ली - आकार पाहता हा देशातील सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ. मात्र, व्यावसायिकांच्या लोकसंख्या अधिक म्हणून सर्वात मोठा. यावेळी येथे प्रतिष्ठेची तिरंगी लढत होत आहे. अशा या ऐतिहासिक मतदारसंघातील लढतीबाबत पंकज पांडेय यांनी उमेदवारांशी केलेली दिलखुलास चर्चा...

हर्षवर्धन
नंबर वन मीच, दोन का तीन काँग्रेस-'आप' ने ठरवावे!
बाजूला कपिल सिब्बल आहेत, तर दुसरीकडे आक्रमक पत्रकार आशुतोष. तुमचे कोणते औषध काम करेल?
मी प्रामाणिकपणा आणि चारित्र्याचे औषध घेऊन मैदानात उतरलो आहे. हा भ्रष्टाचार व अराजकता दूर करेल.
तुम्ही मोदी नावाच्या आश्रयाला असल्याचे बोलले जाते.
निवडणूक मोदी किंवा हर्षवर्धन यापैकी कोणाच्याही नावाने होत नाहीये. मात्र, मोदी आज लोकांच्या अपेक्षांचे प्रतीक बनले आहे, हे खरे आहे. लोकांना आपल्या भविष्यातील उमेद मोदींच्या नेतृत्वात दिसत आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असणारच.
या मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत ओढाताणही आहे. तरी तुम्ही विजयाचा दावा करत आहात?
काँग्रेस व आम आदमी पार्टी भ्रष्टाचार व अराजकतेचे प्रतीक बनलेले आहेत. लोकांना सर्व काही माहीत आहे. लोकांना भाजप एक चांगला पर्याय वाटतो.
राजकारणात प्रथम क्रमांकाचा शत्रू कोण आहे, काँग्रेस की आप?
कोणाशी वैयक्तिक लढाई नाही. माझा कोणी प्रथम क्रमांकाचा शत्रू नाही. मी नंबर एकवर आहे, हे माहीत आहे. इतर दोघांना दोन आणि तीन क्रमांकासाठी लढाई करायची आहे. दोन्ही पक्ष एकमेकांची ए आणि बी टीम आहे. त्यांना दोन किंवा तीनपैकी कोणताही नंबर मिळो, फरक पडणार नाही.
तुम्ही दिल्लीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते, लोकसभा लढवत आहात. म्हणजे तुम्ही दिल्लीचे राजकारण सोडले?
असा काही निर्णय झालेला नाही. आता दिल्लीचा चॅप्टर क्लोज आहे. ते नंतर पाहिले जाईल. सध्या पक्षाने मला लोकसभेची निवडणूक लढायला सांगितले. लढत आहे.