आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrababu Naidu Notice Bye Delhi Commissioner,Oppose For Fast

चंद्राबाबूंचा उपोषणाचा दुसरा दिवस, आंध्रभवन सोडण्याची आयुक्तांची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयाविरोधात हैदराबादचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी दंड थोपटले आहे. दिल्लीतील आंध्रभवनात उपोषणाला बसलेले नायडू यांच्या उपोषणाचा आज (मंगळवारी) दुसरा दिवस असताना त्यांना आंध्रभवन सोडण्याची नोटीस निवासी आयुक्तांनी बजावली आहे.

चंद्राबाबू यांना आंध्रभवनात केवळ पत्रकार परिषदेसाठी परवानगी दिली होती, परंतु त्यांनी तेथेच उपोषण सुरु केले होते. आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर आता चंद्राबाबू नायडू आपल्या उपोषण स्थळात बदल करतात काय?, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे हैदराबादे वाएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष जगमोहन रेड्डींच्या उपोषण सुरु केले असून त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. स्वतंत्र तेलंगणाविरोधात आंध्र प्रदेशातील दोन ‍दिग्गज नेत्यांनी बंड फुकारल्यानंतर आंध्र प्रदेशात तणाव कायम आहे.