आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्रिमंडळात बदल? मोदी आगामी राजकीय अभियानास अंतिम रुप देण्याच्या तयारीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हाती लोकसभा निवडणुकीसाठी सध्या १८ महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे मोदी आगामी राजकीय अभियानास अंतिम रुप देण्याच्या तयारीत आहेत.
 
लोकसभेसोबत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवरही त्यांचा कटाक्ष आहे. भाजप संघटना आणि आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करून ते सामाजिक समीकरणाची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या उच्च पदस्थ सुत्रांच्या मते, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्व्हम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या गटांचे विलिनीकरण त्यांना आघाडीत सामिल करून घेण्याची जबाबदारी मोदींनी स्वत:कडेच ठेवली आहे.

या अभियानात अर्थमंत्री अरूण जेटली आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव हेसुद्धा सक्रीय आहेत. जयललिता यांच्या मृत्यूची न्यायिक चौकशी आणि त्यांच्या निवासस्थानाला संग्रहालयात रुपांतरीत करण्याची पन्नीरसेल्व्हम गटाची मागणी पलानीस्वामी यांनी मान्य केल्याने विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, मुख्यमंत्री तसेच पक्ष सरचिटणीसपदावरून अजुनही संभ्रमावस्था आहे. आता पन्नीरसेल्व्हम यांना मुख्यमंत्री आणि पलानीस्वामी यांना सरचिटणीस बनवण्यावर विचार सुरू आहे. कलराज मिश्र यांनाही डच्च्ू देण्याची शक्यता आहे, पण लोकसभा निवडणुकीपूर्वी पोटनिवडणूकीचा जोखीम पत्करण्याचा पक्षाचा मानस नाही. शिवाय, ब्राम्हण नेते असल्याने जातीय समीकरण टिकवून ठेवण्यासाठी ते मंत्रिमंडळात कायम असतील. जी. सिद्धेश्वरा यांना वगळले तेव्हापासून मंत्रिमंडळात एकही लिंगायत नेता नाही. त्यामुळे कर्नाटकातील सुरेश आंगडी यांना संधी मिळू शकते.
 
प्रमुख मंत्रिमंडळात मोठे फेरबदल : स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय परत घेऊन माहिती प्रसारण मंत्रालयाची पूर्णवेळ जबाबदारी, विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे पर्यावरण खाते तसेच सुरेश प्रभू, राधामोहन सिंह, राजीव प्रताप रुडी यांच्याकडील खातेही बदलू शकते. नितिन गडकरी यांनी चीनच्या धर्तीवर एकच वाहतूक विभाग बनवण्यासाठी पीएमओमध्ये प्रेझेंटेशन दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे हा विभाग सोपवला जाऊ शकतो.
 
5 सप्टेंबरपर्यंत शक्यता
ऑगस्टच्याशेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो. कारण सप्टेंबरनंतर श्राद्ध सुरू होतील. ते २० सप्टेंबरपर्यंत चालेल. २१ ते २९ सप्टेंबर नवरात्र तर ३० ला विजयादशमी आहे. म्हणूनच तत्पूर्वी हे बदल होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
अद्यापही रिक्त मंत्रालय
वनपर्यावरण मंत्रालय (अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे), शहर विकास मंत्रालय (एम. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती बनल्याने), संरक्षण (मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री बनल्याने जेटलींकडे प्रभार) आणि माहिती प्रसारण मंत्रालय पूर्णवेळ मंत्र्यांविना रिक्त आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...