आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi Elections : 14 महिन्यांत कधी 'आप'ने तर कधी भाजपने घेतली आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या 14 महिन्यांत तिसऱ्यांदा निवडणुका होत आहेत. यापूर्वी डिसेंबर 2013 मध्ये विधनसबा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर मे 2014 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. आता पुन्हा 7 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. गेल्या 14 महिन्यांची आकडेवारी पाहता, कधी भाजप तर कधी आपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले आहे.
1. विधानसभा निवडणूक 2013 : भाजप पुढे पण सरकार "आप'चे
डिसेंबर 2013 मध्ये आम आदमी पार्टी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात होती. त्यावेळी आपने काँग्रेस च्या 18 आणि भाजच्या 10 जागा हिसकावत 28 जागा मिळवल्या होत्या. भाजपनेही काँग्रेसच्या काँग्रेसच्या ताब्यातील 17 जागा हिसकावल्या होत्या. शिरोमणी अकाली दलची एक जागा पकडून भाजप 31 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. पण सरकार बनले ते आम आदमी पक्षाचे, तेही काँग्रेसच्या पाठिंब्यावर. 2008 मध्ये काँग्रेसने 43 जागा मिळवल्या होत्या.

2. लोकसभा निवडणूक 2014 : भाजपला 60 जागांवर आघाडी
दिल्लीच्या सातही जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. विधानसभा मतदारसंघांचा विचार करता भाजपला 60 मतदारसंघात आघाडी मिळाली. तर 9 मतदारसंघात आपला आणि एका मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे दिल्लीत सत्तेपासून दूर राहूनही भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला होता.
3. 2015 विधानसभा निवडणूक : सर्वेक्षणांत पुन्हा AAP ची आघाडी
विविध वाहिन्यांनी आणि संस्थांनी केलेल्या मतदारपूर्व सर्वेक्षणांमध्ये पुन्हा "आप'ने आघाडी घेतली आहे. एबीपी-नीलसनच्या सर्वेक्षणात जानेवारीत भाजपला 34 जागा मिळत असल्याचे चित्र समोर आले. पण फेब्रुवारीतील सर्वेक्षणात भाजपला 29 जागा दिल्या. तर आपला 28 ऐवजी 35 जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एचटी-सीफोर च्या सर्वेक्षणानुसार AAP ला 36 ते 41 आणि भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे आणि सिसेरोच्या सर्वेक्षणातही भाजपला 19 ते 25 आणि AAP ला 38 ते 46 जागा मिळण्याचा दावा करण्यात येत आहे.