आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना सुप्रीम कोर्टाचा दणका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्‍ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने एक जबरदस्त झटका दिला आहे. चारा घोटाळाप्रकरणी सुनावणी रांची बाहेर हलवण्याची आणि न्यायाधीश बदलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवार) फेटाळली. तसेच याप्रकरणी लवकरच निर्णय देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह चार जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्‍यात आले आहेत. मात्र, ट्रायल कोर्टाचे न्यायाधिश पी.के.सिंह हे भेदभाव करत असल्याचा आरोप लालूंनी केला होता. तसेच रांची येथील कोर्टात होणारी सुनावणी अन्य कोर्टात करण्याची मागणीची याचिका लालूंनी दाखल केली होती.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याबाबत...