आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पावसामुळे चारधाम यात्र ठप्प, आसाममध्ये आईसह चार मुलांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडालेला ट्रक. - Divya Marathi
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडालेला ट्रक.
नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पाऊसानंतर आज (बुधवार) यमुनोत्री आणि गंगोत्री हायवे बंद करण्यात आला आहे. चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना सुरक्षीत ठिकाणीच थांबवण्यात आले आहे. तिकडे, पूर्वोत्तरमध्येही पावसाने जोर धरला आहे. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात भूस्खलनामुळे एका महिलेसह तिच्या चार मुलांचा मृत्यू झाला आहे.
पावसाने कुठे-कुठे घातला धुमाकूळ
पश्चिम मध्य भारतापासून उत्तर भारतापर्यंत पावसाने जोरदार हजरे लावली आहे. जम्मू-काश्मिरच्या राजौरी भागातही जोरदार पाऊस झाला आहे. मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, भिवंडीसह अनेक उपनगरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. सखल भागात 8 ते 10 फूट पाणी साचले आहे.
संततधार पावसामुळे उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. उत्तरकाशीच्या वरुणावत डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये बुधवारी वाढ झाली. त्यामुळे त्याच्या आसपास राहाणारे जवळपास 10 हजार लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत जम्मू-काश्मीरसह उत्तराखंड आणि आसाममध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. धोक्याचा इशारा दिला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशातील विविध राज्यांमध्ये पावसाने घातलेला धुमाकूळ