आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी त्यागी, 9 जणांवर आरोपपत्र, 3600 कोटींच्या करारात लाचेचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारात माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी आणि इतर नऊ जणांच्या विरोधात सीबीआयने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव ऊर्फ ज्युली आणि वकील गौतम खेतान यांचेही नाव आहे. खेतानला कराराचा सूत्रधार संबोधण्यात आले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाचेची रक्कम भारतात कशी पोहोचली याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांमार्फत पैसा पोहचवण्यात आला, त्या अस्तित्वात कशा आल्या, याचीही माहिती आहे. संजीव ज्या मध्यस्थाला ओळखत होता त्या कार्लो गॅरोसा याचे नावही आरोपपत्रात आहे.

२००४ ते २००७ पर्यंत हवाई दलाचे प्रमुख राहिलेले त्यागी, त्यांचा भाऊ संजीव आणि खेतान यांच्यावर ब्रिटनमधील ऑगस्टा वेस्टलँडकडून १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप झाला होता. त्यांनी ऑगस्टा वेस्टलँडकडून लाच घेतली होती आणि ५३ कोटी डॉलरचे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीला मदत केली होती, असाही आरोप आहे. या सर्वांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयने अटक केली होती. १२ मार्च २०१३ रोजी या प्रकरणी एक एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड ही अँग्लो-इटालियन कंपनीही प्रमुख आरोपी आहे. सीबीआय पुढील सुनावणीच्या वेळी आणखी कागदपत्रे आणि परिशिष्ट न्यायालयात दाखल करण्याचा शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...