आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या BIKINI KILLER ने वयाच्या 64 व्या वर्षी तरण्याताठ्या पोरीशी थाटला होता विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - पत्नी निहिता सोबत चार्ल्स - Divya Marathi
फाइल फोटो - पत्नी निहिता सोबत चार्ल्स
नवी दिल्ली- 'बिकिनी किलर' या नावाने ओळखल्या जाणारा चार्ल्स शोभराज याच्या जीवनावर आधारित 'मैं और चार्ल्स' हा सिनेमा 26 जूनला रिलीज होत आहे. प्रवाल रमणद्वारा दिग्दर्शित सिनेमात चार्ल्स शोभराजच्या भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा दिसणार आहे.

70 च्या दशकात दक्षिणपूर्वी आशियातील काही देशांत विदेशी पर्यटकांना ठगण्यात चार्ल्स शोभराज माहिर आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगातून पलायन करून 20 वर्षीय युवतीशी विवाह करणार्‍या 64 वर्षीय चार्ल्सचे आयुष्य अशा अनेक चढउतारांनी व्यापले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला शोभराज चार्ल्सविषयी माहिती घेवून आलो आहे.

प्यार, सेक्स आणि मर्डर
चार्ल्स शोभराजचा जन्म व्हियतनाममध्ये झाला. चार्ल्सची आई व्हियतनामी आणि वडील वडील भारतीय होते. चार्ल्सचे खरे नाव हतचंद भाओनानी गुरुमुख आहे. त्याचा क्राइम जगतात 'बिकिनी किलर' या नावाने ओळखले जाते.

1970 मध्ये चार्ल्सने 24 लोकांची निर्घृण हत्या केली होती. यात बहुतांशी विदेशी पर्यटक महिलांचा समावेश होता. भारतात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी महिलांना चार्ल्स गुंगीचे औषधी द्यायचा. नंतर त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्याही करायचा.

तिहार तुरुंगातून यशस्वी पलायन
चार्ल्सने 1976 मध्ये भारतात आलेल्या एका फ्रेंच पर्यटकांच्या समुहाला संपवले होते. तसेच इस्रायलच्या पर्यटकांची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा झाली होती. चार्ल्सची दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी करण्‍यात आली होती. परंतु, चार्ल्स 1986 मध्ये आपल्या काही साथीदारांसोबत तेथून पोबारा करण्यात यशस्वी झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी त्याला पुन्हा जेरबंद केले. नेपाळ येथे त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. चार्ल्स सध्या नेपाळमधील तुरूंगात आहे.

20 वर्षीय नेपाळी प्रेयसी
नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगताना चार्ल्स एका नेपाळी युवतीच्या प्रेमात पार घसरला होता. तुरुंगातच दोघांनी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी निहिता 20 वर्षाची तर चार्ल्स 64 वर्षाचा होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, BIKINI KILLER चार्ल्स शोभराजची निवडक फोटो...