आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chautala Alleged CM Bhupinder Hudda For Second Marriage

एन. डी. तिवारीनंतर काँग्रेसच्या आणखी एका मुख्यमंत्र्यांना अनौरस पुत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- ज्या दिवशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायणदत्त तिवारी यांनी रोहित शेखर याला आपला मुलगा मानले त्याच दिवशी हरियाणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी दुसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर दुसरे लग्न केल्याचा व त्या महिलेला हुड्डा यांच्यापासून रजत नावाचा एक मुलगा असल्याचा आरोप इनेलो नेता आणि ऐलनाबादचे आमदार अभय सिंह चौटाला यांनी केला आहे. चौटाला यांनी याबाबत सोमवारी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. चौटाला यांनी सांगितले की, हुड्डा यांची दुसरी पत्नी शशी डेहराडून येथे राहते. तिने कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायद्यानुसार दावा दाखल केला आहे. डिसेंबर 2013 मध्ये हा दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची कायदपत्रेही चौटाला यांनी विधानसभेत सादर केली. मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी चौटाला यांच्या या आरोपाला उत्तर दिले नाही.
मात्र, मुख्यमंत्र्यांचे वतीने रोहतकचे आमदार बीबी बत्रा यांनी सांगितले की, संबंधित महिलेने 17 डिसेंबर रोजी दावा दाखल केला होता. मात्र कोर्टाने सुनावणी सुरु करताच तिने तो मागे घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण संपलेले आहे. तसेच संबंधित महिलेला विरोधकांनी फूस लावली आहे. मात्र आरोपांत काहीही तथ्य नाही.
असे असले तरी बत्राही काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री हुड्डा आणि संबंधित महिलेचा संबंध राहिले आहेत काय?, मुख्यमंत्री त्या महिलेला ओळखतात का?, आता संबंधित महिला कोठे आहे?, या प्रश्नांची उत्तरे बत्रा देऊ शकले नाहीत.
चौटाला यांनी आरोप केला की, हुड्डा यांनी दुसरे लग्न 11 नोव्हेंबर 1992 रोजी दिल्लीत केले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. दैनिक भास्करने जेव्हा संबंधित महिलेची याचिका दाखल करणारे वकील जेडी जैन यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.