आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPSC परीक्षांचे गुण पाहा ऑनलाइन, खासगी क्षेत्रातील भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) प्रथमच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे गुण ऑनलाइन शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रस्तावाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
उमेदवारांचे गुण जाहीर केल्यामुळे नियोक्त्याला चांगल्या, पात्र उमेदवारांची निवड करण्यास मदत मिळेल. ज्या उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात मुलाखतीत भाग घेतला, मात्र त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली नाही, अशा उमेदवारांचे यूपीएससी स्पर्धा परीक्षेतील गुण, त्यांची शैक्षणिक पात्रता ही माहिती सार्वजनिक केली जाईल. जाहीर केलेली ही माहिती सार्वजनिक भरती संस्थांसाठी एकीकृत प्रणालीने जोडली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...