आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cheif Ministers Meeting On Internal Security Postpon

अंतर्गत सुरक्षेवरील मुख्यमंत्र्यांचे संमेलन लांबणीवर पडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर पुढील आठवड्यात होणारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. हे संमेलन ३१ जानेवारी रोजी होणार होते, परंतु त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांचे मुख्यमंत्री दिल्ली विधानसभेच्या प्रचारात व्यग्र असण्याची शक्यता असल्याने हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतर्गत सुरक्षा व समाजविघातक मुद्द्यावर ३१ जानेवारीला या बैठकीत चर्चा होणार होती, परंतु पंतप्रधान उपस्थित नसतील, तर धोरणात्मक मोठ्या निर्णयांवर निर्णय घेणे शक्य नव्हते. म्हणून बैठक टाळण्यात आली. २०१४ मध्ये यूपीए आघाडी सरकारने अशा स्वरूपाचे संमेलन सर्वप्रथम आयोजित केले होते. ही बैठक आता फेब्रुवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जिहादी संघटनांचा सामाजिकसुरक्षेला असणारा धोका, सीमेपलीकडील दहशतवाद, इंटरनेट व सोशल नेटवर्किंग साइटद्वारे कट्टरतावादाला दिले जात असलेले प्रोत्साहन आदी मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.