आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वनाथन आनंदच्या नावावर अंतराळात ‘विशि-आनंद’ नावाचा एक ग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वनाथन आनंद. आधी ग्रँडमास्टर, नंतर जगज्जेता. आता ‘विशि-आनंद- ४५३८’. बुद्धिबळाच्या जगातून निघून ‘विशी’ (आनंदचे टोपणनाव) आता अंतराळात नेहमीसाठी या नावाने चमकणार आहे.
जपानी संशोधकांनी अंतराळातील एका ग्रहाचे नाव ‘विशि-आनंद’ असे ठेवले मंगळ आणि गुरू यांच्यामधील या लहान ग्रहाचा शोध १० ऑक्टोबर १९८८ ला लागला होता. जपानच्या आयची प्रांतातील टोयोटातील खगोल संशोधक केंजो सुझुकी यांनी तो शोधला. त्या वेळी त्याचे नामकरण झाले नव्हते.
लघु ग्रह समितीचे अध्यक्ष मायकेल रुडेंको यांच्यावर नामकरणाची जबाबदारी सोपवली होती. रुडेंको बुद्धिबळ खेळतात. ते आनंदचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी १५ वा बुद्धिबळ जगज्जेता आनंदच्या नावाने या ग्रहाचे नामकरण केले.

विशीलाही खगोल विज्ञानात रस
विशीलाही खगोल विज्ञानात रस आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेतून २०१३ मध्ये लेगून नेबुलाचे (तारा बनण्यापूर्वी जमा झालेला वायूचा फुगा) छायाचित्र (वरील) घेतले होते.
नावाने ग्रह असलेला पहिला भारतीय खेळाडू
अंतराळातील ग्रहाचे नामकरण केलेला पहिला भारतीय खेळाडू अशी नोंद विश्वनाथनच्या नावावर झाली. अर्थात जगातील इतर दोन बुद्धिबळपटूंच्या नावावर ग्रहांचे नामकरण झाले आहे. रशियाचा अलेक्झांडर अलेखिन व अनातोली कार्पोव्ह हे ते दोन खेळाडू. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, स्पेनचा राफेल नदाल व स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या टेनिसपटूंच्या नावानेही ग्रहांचे नामकरण झाले आहे.