आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांचा अजितदादांवर निशाणा; विलंबाचे खापर वित्त विभागावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातले 44 टोलनाके बंद करण्याच्या निर्णयाची घोषणा होताच राज्य सरकारमध्ये वाक्युद्धाचा भडका उडाला. लोकसभेतील पराभवानंतर अस्वस्थ असलेले बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोलनाके रद्द करण्यात झालेल्या विलंबाचे खापर अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच फोडले आहे.

‘कमी खर्चाचे टोलनाके बंद करण्याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वीच वित्त विभागाकडे पाठवला होता,’ असे भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मात्र या विलंबाचे सर्मथन केले. ‘बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी आला होता. मात्र त्याची व्यवहार्यता तपासून पाहणे गरजेचे होते. अर्थसंकल्पात तरतूद करणे व आचारसंहितेमुळे निर्णय विलंबाने झाला,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
देर आए, दुरुस्त आए
‘लोकसभेतल्या दणक्यानंतर सरकारला सुचलेले उशिराचे शहाणपण असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मारला, तर ‘ देर आये पर दुरुस्त आये’ असे म्हणत आमच्या आंदोलनाचे फलित काय हे विचारणार्‍यांना आता या निर्णयानंतर चपराक बसली असेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.