आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Iaf To Carry Out Retaliation Attacks From Air

नक्षलींनी हेलिकॉप्टरवर हल्ला केला तर आता एअरफोर्स देईल प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अँटी नक्षल ऑपरेशन्समध्ये लवकरच नवे बदल आंमलात येणार आहेत. इंडियन एअरफोर्स आणि छत्तीसगड सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार नक्षलवाद्यांनी एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरवर हल्ला केला तर एअरफोर्स देखील त्यांच्यावर हवाई हल्ला करेल. अँटी नक्षल ऑपरेशनचे अतिरिक्त महासंचालक आर.के.विज यांनी एका इंग्रजी दैनिकाला यासंबंधी माहिती दिली. याआधी छत्तीसगड सरकारने एअरफोर्सची मदत घेण्यास नकार दिला होता. आता सुरु होणारी कारवाई देखील मर्यादित राहाणार आहे. फक्त बस्तरच्या जंगलामध्येची ही कारवाई केली जाईल.

पोलिस आणि एअरफोर्स यांचा संयुक्त अभ्यास
विज यांच्या माहितीनूसार, 'नक्षली नेहमी एमआय-17 हेलिकॉप्टर्सला लक्ष्य करत असतात. त्यात आमचे जवान आणि सामान्य लोकही बळी पडतात. मात्र या हल्ल्यांना एअरफोर्सने आजपर्यंत प्रत्युत्तर दिलेले नाही. वास्तविक आपल्याला कारवाईचा कायदेशीर अधिकार आहे.' आता छत्तीसगड आणि एअरफोर्सने केवळ प्रत्युत्तरादाखल हल्ल्याचीच तयारी केलेली नाही तर त्यासाठीचा संयुक्त अभ्यासही केला आहे.

बस्तरवर फोकस
सूत्रांच्या माहितीनूसार, नक्षलवादाचा मोठा प्रभाव बस्तरच्या जंगलात आहे आणि याच क्षेत्रात त्यांनी हेलिकॉप्टरवर सर्वाधिक हल्ले केलेले आहेत. गरुड कमांडोच्या एमआय-17 हेलिकॉप्टर्सला त्यांनी अनेकदा लक्ष्य केले आहे. विज म्हणाले, 'आता जवानांवर हल्ला झाला तर आम्ही हातावर हात धरून बसणार नाही. आम्ही देखील चोख प्रत्युत्तर देऊ.' यामुळे परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी दावा केला.