आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chhattisgarh Lawyer Consumes Phenyl In Supreme Court Premises

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वकील महिलेने सुप्रीम कोर्टात केला फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - छत्तीसगड उच्च न्यायालयात वकिली करणा-या एका वकील महिलेने लैंगिक शोषण प्रकरणी न्याय न मिळाल्याने सोमवारी सुप्रीम कोर्ट परिसरात फिनाइन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अर्धी बेशुदधावस्थेत असलेली ही महिला मुथ्य न्यायाधीश आर एम लोढा यांच्या न्यायालयात दाखल झाली. लैगिक शोषण प्रकरणी न्याय मिळत नसल्यामुळे आपण न्यायालय परिसरातच फिनाइल घेऊन आत्महत्या करत असल्याचे ती म्हणाली. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2013 मध्ये तिचे दोन दीर आणि घरातील इतर दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. त्यासंदर्भात तीने न्यायालयात पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. पण तरीही तिला न्याय मिळाला नाही. दरम्यान तिने फिनाइल प्यायल्याचे सांगताच मुख्य न्यायाधीशांनी तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी ठेण्याचे आदेश दिले. प्राथमिक उपचारांनंतर या महिलेला राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.