आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Student Locked Up And Gang Raped For Two Days

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला ठेवले डांबून, प्लेसमेंट ओनर्संकडून विद्यार्थिनीवर गॅंगरेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत एका सुशिक्षित तरुणीला नोकरीचे आम‍िष दाखवून तिच्यावर सामूहीक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी प्लेसमेंट कंपनीचे मालक असल्याचे सांगून 21 वर्षीय तरुणीवर दोन दिवस डांबून ठेवले आणि आळीपाळीने तिचे लैंगिक शोषण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी छत्तीसगडमधील कांकेर येथील रहिवासी असून ती पदवीच्या पहिल्या वर्षीची विद्यार्थिनी आहे. दोन भामट्यांनी तिला प्लेसमेंट कंपनीचे मालक असल्याचे सांगून तिला नोकरीचे आमिष दाखवले. तिला फेक कंपनीच्या नावाने कॉललेटर पाठवून तिला इंटरव्हूसाठी दिल्लीत बोलावून घेतले. पीडिता नोकरी मिळण्याच्या मनिषेने दिल्लीत दाखल झाली. नंतर दोघांनी तिला एका घरात दोन दिवस डांबून ठेवले. या दरम्यान दोघांनी तिच्यावा सामूहीक बलात्कार केला.

आरोपींनी असे रचले जाळे...
आरोपींनी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून आठ महिन्यांपूर्वी पीडितेने जॉबसाठी अप्लाय केला होता. नंतर आरोपींनी तिला कॉल करून एअरपोर्ट भागात नोकरी देण्याची ऑफर केली होती. विशेष म्हणजे कंपनीतर्फे प्लॅटही मिळणार असल्याचे सांगितले होते. एका खासगी घरातच कंपनीचे गेस्ट हाऊस करण्‍यात आले होते. पीडिता तिच्या चुलत भावासोबत आली होती.
दिल्लीत एका हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. विशेष म्हणजे पीडितेला इंटरव्हूला आणण्यासाठी आरोपीने अजय नामक एका कार चालकाची मदत घेतली. इंटरव्हूनंतर जॉब निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्याच रात्री तिला गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पीडिता जशी गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट झाली. दोघांनी तिचा मोबाइल हिसकावून घेतला. दोन दिवस तिला डांबून ठेवले. त‍िला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर सामू‍हीक बलात्कार केला. दोन दिवसांनी पीडितेने आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सूटका करून आपल्या चुलत भावाला 'आपबिती' सांगितली. त्यानंतर दोन्ही आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्‍यात आली. पीडितेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.