आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Rajan Could Help To Thicken The Dawood Dossier

छोटा राजन म्‍हणाला, \'मी कुणालाच घाबरत नाही\', समोर आला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्‍ली - एकेकाळी दाऊदचा निक‍टवर्तीय असलेल्‍या छोटा राजन याला इंटरपोलने अटक केली. त्‍याला भारतात आणण्‍यासाठी येत्‍या दोन-तीन दिवसांत सीबीआयचे पथक इंडोनेशियात जाऊ शकते. दरम्‍यान, आज (बुधवार) छोटा राजनचा एक व्‍ह‍िडिओ समोर आला आहे. यात त्‍याला हातकडी लावलेल्‍या दिवस असून, तो कारागृहात आहे. त्‍याने दाऊदच्‍या भीतीने स्‍वत:ला अटक करून घेतली, अशी चर्चा आहे. त्‍यावर एका वृत्‍तवाहिनीशी बोलताना तो म्‍हणतो की, ''मी कुणालाच घाबरत नाही.''
दाऊद बाबत मिळणार महत्‍त्‍वाची माहिती
त्‍या नंतर आता भारताने दाऊदच्‍या अटकेसाठी हालचाली गतीमान केल्‍यात. दरम्‍यान, छोटा राजन याच्‍याकडून 1993 च्‍या मुंबई बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी मिळणारी माहिती सरकारसाठी महत्‍त्‍वाची ठरणार आहे. विशेष म्‍हणजे गत महिन्‍यामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या यूएई दौऱ्यात दाऊदची संपत्‍ती सील करण्‍याची मागणी केली होती. आता होऊ घातलेल्‍या ब्रिटेन दौऱ्यातही ते दाऊदचा मुद्दा उपस्‍थि‍त करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.
काय माहिती देऊ शकतो छोटा राजन ?
> दाऊद पाकिस्‍तानात कुठे आहे, त्‍याचे नेटवर्क आणि त्‍याच्‍या हालचाली बाबत छोटा राजन भारताला माहिती देऊ शकतो.
> इंटेलिजेंसच्‍या एका अधिकाऱ्यानुसार, ''दाऊदविरुद्ध कारवाई करण्‍यासाठी छोटा राजनची अटक खूप महत्‍त्‍वाची आहे. त्‍यासाठी मदतच होईल.''
> असे सांगितले जाते की, छोटा राजन आतापर्यंत भारताच्‍या सुरक्षा संस्‍थांच्‍या संपर्कात होता. त्‍याने दाऊद बाबत काही माहिती दिली आहे. आता त्‍याच्‍या अटकेनंतर आणखी काही बरीच माहिती मिळणार आहे.


कोण आहे छोटा राजन ?
> राजन (वय 55) हा कुख्‍यात गुंड आहे. मागील 20 वर्षांपासून तो भारतातून फरार आहे. वर्ष 1995 मध्‍ये इंटरपोलने त्‍याला मोस्ट वॉन्टेड घोषित केले होते.
> एकेकाळी तो दाऊदचा खूप विश्‍वासू होता.
> दाऊदसोबत वाद झाल्‍यानंतर त्‍याने आपली वेगळी गँग तयार केली.
> त्‍याच्‍यावर भारतात 68 केस आहेत. त्‍यात खून, दरोडे, अपहरण, ड्रग्स आणि स्मगलिंगचे गंभीर गुन्‍हे आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अटकेच्‍या बातमी मागील बातमी...