नवी दिल्ली - अडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहारच्या 2 नंबरच्या तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेची पूर्णपणे खबरदारी येथे घेतली जात आहे. छोटा शकीलने दिलेल्या धमक्या आणि डी कंपनीचा धोका लक्षात घेऊन राजनला कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी तामिळनाडूचे पाच स्पेशल पोलिस ठेवण्यात आले आहेत. ज्या सेलमध्ये राजनला ठेवण्यात आले आहे. तो प्रतिबंधित झोन घोषित करण्यात आला आहे.
प्रतिबंधित झोनमध्ये सामान्यांना प्रवेश बंद
राजनसाठी बनवण्यात आलेल्या प्रतिबंधित झोनमध्ये सामान्य कैदी सोडा जेलचे पूर्ण कर्मचारी आणि अधिकारीही फिरकू शकत नाही. ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड पूर्ण क्लियर आहे. त्यांनाच येथे प्रवेश आहे.
अन्य कैद्यापासून राजनला धोका?
राजनला अन्य कैद्यांपासून धोका पोहचू शकतो. त्यामुळे तामिळनाडूचे पाच स्पेशल पोलिस कमांडो त्याच्या सेलच्या परिसरात आहेत. या पोलिसांजवळ कोणत्याही प्रकारचे हत्यारं नाहीत. राजनला अन्य कैद्यांपासून दुखापत पोहोचू नये याची विशेष खबरदारी पोलिस घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशी आहे राजनची सुरक्षा..