आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षांनंतर मायदेशी आला छोटा राजन, डॉक्टर म्हणाले- किडनीचा आजार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय पोलिस आणि गुप्तचर खात्याचे अधिकारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला घेऊन अखेर शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचले. राजनला इंडोनेशियाची राजधानी बाली येथून चार्टर्ड प्लेनने राजधानी दिल्लीत आणण्यात आले. 27 वर्षांनंतर राजन मायदेशी परतला आहे. त्याचे मेडिकल चेकअप एम्समध्ये करण्यात आले.

राजन एकदम OK
शुक्रवारी छोटा राजनला एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याचे मेडिकल चेकअप झाले. चेकअप करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे, की राजन एकदम ठिक असून त्याला कोणताही गंभीर आजार नाही. याआधी आलेल्या वृत्तानूसार, छोटा राजनची किडनी निकामी झाली असून त्याला डायलिसिसची गरज असते, असे म्हटले गेले होते.

राजन सीबीआयच्या ताब्यात
सूत्रांच्या माहितीनूसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर राजन भारतीय धरतीपुढे नतमस्तक झाला आणि धरणीचे चुंबन घेतले. तो स्वतःला देशभक्त असल्यासारखे वारंवार दाखवत आहे. विमानतळावरुन त्याला थेट केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात नेण्यात आले.

मीडियाने केला डमीचा पाठलाग
काही वृत्तवाहिण्यांनी दावा केला, आहे, की छोटा राजनच्या जिवाला असलेल्या धोक्यामुळे त्याचा डमी देखिल सोबत ठेवण्यात आला आहे. माध्यमे आणि त्याच्यावरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन असे करण्यात आले आहे. राजन दिल्लीत पोहोचल्यानंतर काही मीडियाकर्मींनी त्याच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. नंतर कळाले की ते राजनच्या डमीचा पाठलाग करत होते. खरा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे तर डिटेंशन सेंटरला पोहोचला होता.
का हायर केला डुप्लिकेट
राजनच्या डमीचा शोध तीन दिवसांपासून सुरु होता. राजनला केवळ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासूनच धोका नाही तर त्याला त्याच्याच गँगच्या लोकांकडूनही दगाफटका होण्याची भीती आहे. राजनचे काही लोक त्याचा शत्रू छोटा शकीलला मिळालेले आहेत. राजनकडून केल्या जाणाऱ्या पेमेंटच्या मुद्यावर ते नाराज होते.
असेही बोलले जात आहे, की काही राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून राजनला धोका आहे. त्यांच्या संबंधाचा खुलासा चौकशीत होऊ शकतो, त्यामुळे ते त्याला संपवण्याचा प्रयत्न करु शकतात. त्यासोबतच राजनने स्वतः म्हटले होते, की मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी दाऊदला मिळालेले आहेत. त्यामुळेही कदाचित राजनसंबंधातील सर्व केसेस सीबीआयकडे देण्यात आल्या आहेत. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

राजन म्हणाला- मायदेशी परततो याचा आनंद
बाली पोलिसांच्या तुरुंगातून गुरुवारी बाहेर पडल्यानंतर छोटा राजन म्हणाला होता, मी माझ्या मायदेशी - भारतात परतत आहे याचा अतिशय आनंद आहे. मंगळवारी राजन म्हणाला होता, 'मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत. त्यांचा माझ्यासोबतचा व्यवहार चांगला नाही.' जेव्हा त्याला विचारण्यात आले, मुंबईला जायला घाबरतो का ? तेव्हा तो म्हणाला, 'मी दाऊदला घाबरत नाही. संपूर्ण आयुष्य मी दहशतवादाविरोधात लढत आलो आहे, यापुढेही लढत राहाणार. सरकारला वाटेल तिथे त्यांनी मला न्यावे. मला फक्त न्याय हवा आहे.'

छोटा राजनवर अनेक गुन्हे
छोटा राजनवर भारतात साधारण 65 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. राजन मुंबईतील नायर गँगमध्ये होता तेव्हा त्याच्यावर खंडणी वसूली, धमकी, मारहाण आणि हत्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो दाऊदच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर गेला. भारतात त्याच्यावर 20 हून अधिक हत्येचे गुन्हे आहेत. 2011 मध्ये मुंबईतील वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या खूनात त्याचा हात असल्याचे म्हटले जाते.

दाऊदसोबतच्या मैत्रीने वाढली ताकद, 1993 च्या स्फोटानंतर दोघांमध्ये वैर
राजन नायर गँगमध्ये काम करत असताना त्याला छोटा राजन नावाने ओळखले जात होते. याच दरम्यान त्याची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत ओळख झाली. दोघांनी मुंबईत वसुली, खून, तस्करी अशी कामे सुरु केली. 1988 मध्ये राजन दुबईला गेला. त्यानंतर त्यांनी भारतातच नाही तर संपूर्ण जगात अवैध धंदे सुरु केले. मात्र बाबरी प्रकरणानंतर मुंबईत 1993 मध्ये बॉम्बब्लास्ट झाला आणि त्यात दाऊदचा हात असल्याचे कळाल्याने राजन हलला. तेव्हापासून तो त्याचा शत्रू झाला. त्याने दाऊदपासून वेगळे होत स्वतःची वेगळी गँग तयार केली. दोघे मित्र एकमेकांचे हाडवैरी झाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा पळाला होता दुबईतून राजन