नवी दिल्ली/बाली- इंडोनेशियात अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची
प्रत्यार्पणप्रक्रिया पूर्ण झाली आहे. राजनला आज (मंगळवार) अटकेत असलेला स्नायपर्स कमांडोंच्या सुरक्षेत भारतात आणले जाणार आहे. कुख्यात डॉन
दाऊद इब्राहिमच्या गुंडांपासून छोटा राजनला धोका असल्याने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याला चार कवच असलेली सुरक्षा देण्यात आली आहे.
चार कवच असलेली सुरक्षा:
चार स्नायपर्सच्या सुरक्षेत राजनला दिल्लीत आणले जाणार आहे. मुंबई पोलिसांचे पहिले कवच हे असेल. पोलिसांसह यात स्वातचे कमांडो देखील असतील. दुसरे कवच आयबीचे असेल. यात इंटेलिजन्स ब्यूरोचे 6 ते 7 अधिकारी असतील. तिसरे कवच हे पॅरामिलिट्री फोर्सचे असेल आणि अंतिम अर्थात चौथे कवच रॉ, सीबीआयचे असेल, अशी माहिती गुप्तचर संस्थेने 'दैनिक भास्कर'ला दिली. समावेश आहे.
राजनचा धक्कादायक खुलासा:
मुंबई पोलिसांत दाऊद इब्राहिमचे पंटर सहभागी आहेत. त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा छोटा राजन केला आहे. परंतु, दाऊदला घाबरत नसल्याचेही राजनने म्हटले आहे.
राजनने केला धक्कादायक खुलासा:
मुंबई पोलिसांत दाऊद इब्राहिमचे पंटर सहभागी आहेत. त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा छोटा राजन केला आहे. परंतु, दाऊदला घाबरत नसल्याचेही राजनने म्हटले आहे.
राजनच्या खुलाशाच्याकडे आयबी, रॉ व सीबीआयने गांभिर्याने घेतले आहे. इंडोनेशियातील बाली येथून राजनला भारतात आणण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. राजनला दिल्लीत आणले जाणार आहे. परंतु, राजनला दिल्लीत नव्हे मुंबईत आणले जाणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बालीमध्ये ज्वालामुखी स्फोट झाल्यानंतर हवेत धुळीचे कण मिसळले होते. त्याचा परिणाम विमान सेवेवर झाला आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले होते.
दरम्यान, छोटा राजनवर मुंबईत खून, तस्करी, खंडणी व ड्रग्ज तस्करीसह सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत.
मुंबई- अलाहाबादेत धरपकड
छोटा राजनला भारतात आणले जात असताना दुसरीकडे मुंबई व अलाहाबादमध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. राजनच्या पंटरचा पोलिस शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांनी राजनचा सहकारी नीलेश दिनकर पराडकर उर्फ शटल्या याला अटक केली आहे. पराडकर व त्याचा एक सहकारी रघु शेट्टीवर भांडुपमधील एका बिल्डरकडून 15 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप आहे.
दुसरीकडे, अलाहाबादमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन शार्पशूटर्सला अटक केली आहे. तिन्ही आरोपी राजनच्या सहकारी अनीस आझाद अंसारीसाठी काम करतात. इंद्रेश, रमेश व सलीम अलाहाबाद येथील राहाणारे आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, छोटा राजनला ठेवणार ‘बॉम्बप्रूफ’ अंडा सेलमध्ये...