आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीजेनिमित्त छोटा राजनच्या बहिणींनी मागितली डॉनला भेटण्याची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाऊबीजेच्या निमीत्ताने डॉन छोटा राजनच्या बहिणींनी भावाला भेटण्याची परवानगी मागितली आहे. छोटा राजनला दोन बहिणी आहेत. शालिनी सकपाळ आणि सुनीता चौहान यांनी शुक्रवारी सीबीआयच्या पटियाला कोर्टात अर्ज सादर केला. भाऊबीजेच्या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना करते. छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले आहे. 27 वर्षांनंतर छोटा राजन भारतात परतला आहे.

बहिणींच्या अर्जावर काय म्हणाले कोर्ट
>> छोटा राजनच्या दोन्ही बहिणी मुंबईत राहातात.
>> छोटा राजनला भेटण्याचा त्यांचा अर्ज कोर्टाने तपास अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.
>> दरम्यान अशीही माहिती आहे, की तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही बहिणींना छोटा राजनला भेटण्याची परवानगी दिली नाही. राजन सीबीआयच्या ताब्यात असून त्यांनी अशी परवानगी देण्यास विरोध दर्शवला.