आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Shakeel\'s Men Holed Up In Indonesia Might Bump Chhota Rajan?

छोटा शकीलच्या शार्पशूटर्सच्या निशाण्यावर छोटा राजन, हल्ला होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निखाळजे हा 'डी कपंनी'च्या शार्पशूटर्सच्या निशाण्यावर आहे. इंडोनेशियातच छोटा राजनवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अंडरवर्ल्डच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, छोटा शकीलने त्याच्या शूटर्सना राजनवर हॉस्पिटल, कोर्ट, जेल तसेच भारतात नेताना हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. इंडोनेशियातील छोटा शकीलचे खबरे राजनच्या हलचालींविषयी माहिती मिळवण्याचे काम करत आहेत.
छोटा शकील डी कंपनीसाठी काम करतो.

दरम्यान, इंडोनेशियात अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला स्नायपर्स कमांडोंच्या सुरक्षेत भारतात आणले जाईल. अचूक नेमबाज असलेल्या या कमांडोंच्या गोळीचा निशाणा सहसा चुकत नाही.

सूत्रांनुसार, राजनला भारतात आणण्यासाठी गेलेल्या पथकात तीन स्नायपर्सचा समावेश आहे. पथकात सीबीआय व काही पोलिस अधिकाऱ्यांसह इतर कमांडोंचाही समावेश आहे. दाऊद इब्राहिमच्या गुंडांपासून छाेटा राजनला धोका असल्याने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत. दरम्यान, एका वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या भारतीय दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी संजीव अग्रवाल यांनी रविवारी राजनची जकार्तामधील तुरुंगात भेट घेतली. राजनला कायदेशीर सल्लागार उपलब्ध करून देणे हा भारत सरकारचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. छोटा राजनवर मुंबईत खून, तस्करी, खंडणी व ड्रग्ज तस्करीसह सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत.

प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू
इंडोनेशियातील भारतीय राजदूत गुरजितसिंह म्हणाले, राजनच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांत महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण केली जाईल. अन्सारी पाच दिवसांच्या दौऱ्यानिमित्त इंडोनेशियात पोहोचले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, D Company च्या भीतीने छोटा राजनने स्वतःच Plan केली अटक