आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chicken Legs Barriers In Industry Kumarmangalam Birla

उद्योग विस्तारात कोंबडीची टांग, अडथळा ठरली, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - औद्योगिक साम्राज्याच्या विस्तारात कधी कोणता अडथळा येऊ शकेल, याचा काहीच नेम सांगता येत नाही. हे अडथळे किमान अपेक्षित तरी असतात, पण एखादा अनपेक्षित अडथळा आ वासून उभा राहिला तर? उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या औद्योगिक साम्राज्याच्या आंतरराष्ट्रीय विस्तारात त्यांच्या कँटीनमध्ये शिजवलेले ‘बटर चिकन’च एकदा अडथळा बनले होते!


अ‍ॅल्युमिनियमपासून ते दूरसंचार क्षेत्रात विस्तारलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला हे मारवाडी समाजाचे. शुद्ध शाकाहार हा मारवाडी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आणि श्रद्धेचा विषय! त्यामुळे बिर्ला समूहाच्या कोणत्याही कंपनीच्या कँटीनमध्ये मांसाहारी पदार्थ अजिबात शिजवले जात नाहीत आणि समूहाच्या कोणत्याही कार्यक्रमात वाइन किंवा व्हिस्कीही कधी सर्व्ह केली जात नाही.


ऑस्ट्रेलियात मात्र बिर्ला समूहासमोर वेगळीच समस्या उभी राहिली. फोस्टर बिअर आणि बार्बेक्यूस हा बहुतांश कंपनी कामगारांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे बिर्लांच्या प्रथेला मुरड घालावी लागली. ‘रिइमॅजिनिंग इंडिया : अनलॉकिंग द पोटेंशियल ऑफ एशियाज नेक्स्ट सुपरपॉवर या पुस्तकात बिर्ला यांनीच ही आपबिती सांगितली आहे. मॅकिन्से या कन्सल्ंिटग फर्मने देशातील आघाडीच्या नेतृत्वाचे दृष्टिकोन या पुस्तकात संकलित केले आहेत.


धर्म आणि श्रद्धांनुसार
औद्योगिक विस्ताराला मुरड
० अंबानींनी गुंडाळला मांसाहारी रिटेल उद्योगाचा प्रस्ताव
काही वेळा एखाद्याच्या खानपानाच्या सवयी व जीवनशैली आणि औद्योगिक निर्णय वेगळे करता येत नाहीत. त्यामुळेच गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने
मांसाहारी खाद्यपदार्थांच्या रिटेल व्यापाराची योजना गुंडाळली होती. अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या कंपनीचे बहुतांश भागधारक गुजराती आणि जैन समाजाचे असून मांसाहाराच्या उद्योगामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावत असल्याची त्यांची भावना होती.
० भारतीयांसाठी मॅकडोनाल्डने बदलला बर्गर
बीफपासून बनवलेल्या मॅक बर्गरसाठी मॅकडोनाल्ड जगभरात प्रसिद्ध आहे, पण भारतात आल्यानंतर मॅकडोनाल्डला बर्गरला स्थानिक साज चढवावा लागला. अनेक पाश्चात्त्य कंपन्यांनाही विक्री वाढवण्यासाठी त्यांची उत्पादने भारतीय परंपरेनुसार तयार करणे भाग पडले आहे.