आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chidambaram Ban On Salman Rushdies Book By Rajiv Gandhi Govt Was A Mistake

चिदंबरम म्हणाले - \'सटॅनिक वर्सेंस\'वर घातलेली बंदी राजीव गांधी सरकारची चूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सलमान रश्दी यांचे 'सटॅनिक वर्सेंस' पुस्तकावर बंदी घालण्याचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारचा निर्णय चुकीचा होता, असे म्हणताना मला कोणताही अडचण वाटत नसल्याचे म्हटले आहे.
देशात असहिष्णुता वाढत आहे
एका मीडिया हाऊसच्या कार्यक्रमात बोलताना चिदंबरम म्हणाले, 'माझ्यासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय देशात वाढत असलेली असहिष्णुता आहे. आम्ही एक समाज म्हणून उदार राहिलेलो नाही.' चिदंबरम म्हणाले, नजीकच्या काळात देशात कट्टतावादाला खतपाणी मिळत आहे. मात्र कट्टरतेचा कायम पराभव होत आलेला आहे. ते म्हणाले, 'ज्यांचा स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीवर विश्वास आहे त्यांनी वाढत्या असहिष्णुतेला विरोध केला पाहिजे. तुम्ही तोपर्यंत मॉडर्न आणि उदार समाज होत नाही जोपर्यंत तुम्ही असमानतेचे तत्वज्ञान मुळातून नष्ट करत नाही.'
का लादली होती पुस्तकारवर बंदी
राजीव गांधी सरकारने ऑक्टोबर 1988 मध्ये रश्दी लिखित 'सटॅनिक वर्सेस' पुस्तकावर बंदी आणली होती. तेव्हा या पुस्तकावर बंदी आणणारा भारत हा पहिला देश ठरला होता. या पुस्तकामुळे इराणच्या अयातुल्ला खुमैनीने फतवा काढून मुस्लिमांना आवाहन केले होते की रश्दींना जीवे मारा. या पुस्तकातून इशनिंदा झाल्याचा आरोप काही मुस्लिमांनी केला होता.