आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chidambaram Drags Modi ‘Harvard’ Feud Into Budget Speech

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई व \'हार्वर्ड\'नेच कठोर मेहनत करण्यास शिकवले- चिदंबरम यांचे मोदींना उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज लोकसभेत लेखानुदान (व्होट ऑन अकाऊंट) सादर केले. यावेळी भाषण करताना चिदंबरम यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जबरदस्त उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी हार्वर्ड विद्यापीठावरून चिदंबरम यांच्यावर टिप्पणी केली होती. त्याला उत्तर देताना चिदंबरम यांनी म्हटले की, माझ्या आईने व हार्वर्डने मला खूप कष्ट करण्यास शिकवले आहे.
विकासासाठी काय हवे हार्वर्ड की कठोर मेहनत- चिदंबरम यांच्या वक्तव्याकडे चेन्नईत मोदींनी दिलेल्या भाषणाशी जोडले जात आहे. मोदींनी चेन्नईत म्हटले होते की, अर्थमंत्री हार्वर्ड विद्यापीठात शिकून आले आहेत. पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्याकडेही एका बड्या विद्यापीठाची डिग्री आहे. माझ्याकडे ते नाही पण कठोर मेहनत आहे. हार्वर्डमध्ये जाणे आणि तेथे शिकणे हे काही नविन व वेगळे नाही. महत्त्व फक्त कठोर मेहनतीला आहे. एखादी व्यक्ती ( मोदी स्वत:कडे बोट दाखवून) जी सर्वसाधारण शाळेत गेलेला, रेल्वेत चहा विकलेला आणि हार्वर्डचे गेटसुद्धा पाहिले नसलेल्याने अर्थव्यवस्था कशी चालवावी ते दाखवून दिले आहे. या रीकाऊंटिंग मिनिस्टर ( 2009 साली अर्थमंत्री चिदंबरम यांच्या लोकसभेतील विजयानंतर फेरमतदान मोजण्याची मागणी करण्यात आली होती)मध्ये अहंकार तर किती ते बघा. माझ्याविषयी ते ब-याच दिवसापासून घाणेरडी भाषा वापरत आले आहेत. पण बघू या देशाचे भाग्य कोण बदलोवतोय ते, हार्वर्ड की हार्ड वर्क (कठोर मेहनत). मी शांत यासाठी आहे की, जितके हे लोक चिखलफेक करतील, तेवढ्याच वेगाने कमल फुलणार आहे. आता तुम्हीच ठरवा देशाच्या विकासासाठी आपल्याला हार्वर्ड हवा की हार्ड वर्क?
चेन्नईत मोदींनी का चढविला होता चिदंबरम यांच्यावर हल्ला, वाचा पुढे....