आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारकडे पुरेसा अन्नसाठा, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर मान्सूनमुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले, तर सरकारकडे पुरेसा अन्नसाठा असल्याचे स्पष्टीकरण मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिले आहे. त्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आगामी काळात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे पुरेसा धान्यसाठा असल्याने महागाई नियंत्रणात राहील, असे मत सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केले.

हवामान विभागाने या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान साधारण ९३ टक्के पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या अन्नधान्याच्या किमती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ महागाई दर ५ टक्के कमी झाले आहेत. घाऊक महागाई दर अनेक महिन्यांपासून शून्याच्या खाली आहे. तेलाच्या किमतीदेखील काही काळापर्यंत ५० ते ८० डॉलर प्रति बॅरल राहतील. यात जास्त फरक पडणार नसल्याने सध्या महागाई स्थिर राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ४.८७ टक्के राहिला, जो गेल्या चार महिन्यांतील नीचांक आहे, तर घाऊक महागाई दर उणे २.६५ टक्के राहिला. जो नोव्हेंबर २०१४ नंतरचा सर्वात मोठा नीचांक आहे.
बातम्या आणखी आहेत...