आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Justice HL Dattu Seeks Speedy Disposal In Cases Of Crimes Against Women, Minorities

सुनावणी पाच वर्षांत पूर्ण होणार : सरन्यायाधीश एच. एल. दत्तू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील न्यायालयांत तीन कोटी खटले प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून कोणत्याही खटल्याची सुनावणी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ चालणार नाही, अशी माहिती सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी रविवारी दिली. उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काही खटले २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत, त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत, या प्रश्नावर दत्तू म्हणाले, कोणताही खटला पाच वर्षांनंतर प्रलंबित राहू नये, याची खात्री आम्ही करू. जुन्या खटल्यांसाठी ही कमाल मर्यादा आहे. डेडलाइनचा अर्थ पाच वर्षांत सुनावणी संपायला हवी. पण वरिष्ठ न्यायालयांत अपील केल्यास आणखी काही वेळ लागू शकतो. खटला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहू नये यासाठी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रयत्नरत आहेत. आमच्याही काही अडचणी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या कमी असल्याचे ते म्हणाले.