आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Justice Lodha Breaks His Silence, Calls Decision On Gopal Subramanium Unilateral

सरन्यायाधीशांच्या टीकेवर सरकारचे मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकार न्यायपालिकेचा संपूर्ण आदर करत असल्याचे बुधवारी सांगितले. सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी मंगळवारी सरकारवर टीका केली होती. यामुळे रविशंकर प्रसाद यांना प्रतिक्रिया देणे भाग पडले.
सरन्यायाधीश लोढा यांनी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. तसा प्रयत्न झाल्यास सर्वात आधी आपण पद सोडू, असा इशारा त्यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रह्मण्यम यांची ‘कॉलेजियम’ने शिफारस केली होती. केंद्राने ही शिफारस नाकारली. या मुद्द्यावरून सरकार आणि न्यायपालिकेतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. दरम्यान, सर्व निर्णय एकतर्फी आणि पक्षपाती पद्धतीने घेतले जात असल्याचे काँग्रेस नेते ए.के. अँटनी यांनी म्हटले आहे.

सरकारचा युक्तिवाद
निवड प्रक्रियेअंतर्गत तीन नावांना मंजुरी देण्यात आली होती. सुब्रह्मण्यम यांची फाइल कॉलेजियमने परत पाठवली होती. सुब्रह्मण्यम यांनी स्वत:हून माघार घेतली. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)