आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलाची चूक असेल तरीही सर्व जण न्यायमूर्तींना धमकावतात; सुप्रीम कोर्ट बंद करणेच उत्तम: CJI

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरन्यायाधीश जे. एस. खेर वकिलांच्या वर्तणुकीवर नाराज झाले. - Divya Marathi
सरन्यायाधीश जे. एस. खेर वकिलांच्या वर्तणुकीवर नाराज झाले.
नवी दिल्ली - देशाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी सोमवारी वकिलांच्या वर्तणुकीवर जबरदस्त नाराजी व्यक्त केली. ‘एखाद्या वकिलाने चूक केली असली तरीही त्यांची सर्व जमात त्याच्यासोबत उभी राहून न्यायमूर्तींना धमकावण्यास सुरुवात करते. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयच बंद करणे योग्य ठरेल,’ अशा शब्दांत खेहर यांनी वकील आणि त्यांच्या संघटनांवर टिप्पणी केली.  
 
काही दिवसांपूर्वी वकील मोहित चौधरी यांनी न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयावर हेराफेरीचा आरोप केला होता. सरन्यायाधीशांनी त्यांना अवमानना नोटीस पाठवली होती. सोमवारी दुपारी सुनावणीदरम्यान मोहित चौधरींतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ के. के. वेणुगोपाल, सलमान खुर्शीद, कॉलिन गोन्साल्विस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह अनेक वकील हजर झाले. महाधिवक्ता मुकुल रोहतगी हेही त्यात सहभागी होते. वेणुगोपाल म्हणाले की, मोहित चौधरींनी न्यायालयाला पत्र लिहून आपली चूक मान्य केली आहे. न्यायालयाने त्यांना माफ करावे.  
 
त्यावर सरन्यायाधीश खेहर नाराज झाले. ते म्हणाले,‘यांनी काय केले हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. खूप वाईट केले आहे. जेव्हा एखादा वकील न्यायालयाचा अपमान करतो तेव्हा वकिलांची सर्व जमात त्यांच्यासोबत एकत्र येऊन त्याचा बचाव करतात. तुम्ही न्यायमूर्तींना धमकावता. एकत्र येऊन दबाव निर्माण करता. मनाप्रमाणे काम झाले नाही तर कुठलाही आरोप लावता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेत घसरण होते. त्यापेक्षा न्यायव्यवस्थाच बंद करावी हे उत्तम.’  

त्यावर वेणुगोपाल म्हणाले की, ‘आरोपीकडून अजाणता चूक झाली आहे. न्यायालयाने त्याला माफ करावे.’ त्याला उत्तर देताना सरन्यायाधीशांनी मोहित यांनी लिहिलेले पत्र न्यायालयात वाचून दाखवले. ते म्हणाले, ‘त्यांनी सर्वकाही जाणूनबुजून केले आहे हे त्यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. हेराफेरीचा आरोप लावून  न्यायालयाची अवमानना केली आहे. त्यामुळे माफीचा प्रश्नच उद््भवत नाही.’ त्यानंतर सरन्यायाधीशांनी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला.
बातम्या आणखी आहेत...