आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Justice T S Thakur Get Emotional In Front Of Modi

न्यायपालिकेचा कंठ दाटला: पंतप्रधानांसमोर सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर झाले भावूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीएस ठाकूर रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाले. - Divya Marathi
टीएस ठाकूर रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाले.
नवी दिल्ली- न्यायाधीशांवरील कामाच्या बोजाचा उल्लेख करताना रविवारी देशाचे सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांचे डोळे पाणावले. दाटलेल्या कंठाने ते म्हणाले, तुम्ही संपूर्ण जबाबदारी न्यायपालिकेवर टाकू शकत नाही. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही उपस्थिती होती.
विधी आयोगाने १९८७ च्या अहवालात म्हटले होते की, देशात दर १० लाख लोकसंख्येमागे १० न्यायाधीश असतील. खरे तर हा आकडा ५० असायला हवा. पण काहीच बदलले नाही. ‘गरीब’ लोक वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतात. म्हणून न्यायव्यवस्थेवर टीका पुरेशी नाही. त्यावरील बोजा पाहिला पाहिजे. उपाय म्हणून न्यायाधीशांची रिक्त पदे भरली पाहिजेत. हे सांगताना सरन्यायाधीशांचा कंठ दाटला. डोळे पाणावले. त्यांनी रुमालाने अश्रू टिपले. संपूर्ण भाषणादरम्यान ते भावुकच दिसले.

मी सल्ला दिला होता : मोदी
ठाकूरयांच्या मुद्द्याला भाषणात उत्तर देताना मोदी म्हणाले, न्यायपालिकेत सुट्या घटवून कामाचे तास वाढवून ही कमतरता भरून काढली जाऊ शकते. मी हाच सल्ला याच प्रकारच्या एका संमेलनात एकदा दिला होता. तेव्हा मी पंतप्रधान झालेले नव्हतो. यानंतर माझ्यावर खूप टीका झाली होती. नंतर काही न्यायाधीश मला भेटून म्हणाले होते की, तुम्ही तुमच्याबाबतीत काय सांगता...

पुढील स्लाइडवर वाचा, ठाकूर म्हणाले, एवढा बोजा असताना दर्जेदार कामाची अपेक्षा कशी करणार?