आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्री परिषदेत शहांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी भाजपशासित मुख्यमंत्र्यांनी योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.
पक्षाच्या भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शहा यांनी शनिवारी मार्गदर्शन केले. भाजपच्या सुशासन समितीतर्फे नवीन महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्र्यांची परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. या परिषदेचे उद््घाटन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केले, तर समाराेप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत झाला. केंद्रातील भाजपचे ज्येष्ठ मंत्री, दहा राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री व महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित हाेते. त्या वेळी ते बोलत होते.
भौगोलिकदृष्ट्या देशाच्या ५१ टक्के प्रदेशावर भाजपची सत्ता आहे. ३७ टक्के लोकसंख्येचे अाधिपत्य आहे. सर्वांनी सजग राहून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल. हे पाहिले पाहिजे. केंद्राच्या ८० पैकी ६५ योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यात राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माेदी यांचे ‘सबका साथ, सबका िवकास’ हे ब्रीद अाहेत. केंद्रात अाणि राज्यातही त्यानुसार वििवध याेजना राबविल्या जात अाहेत. एकदिवसीय बैठकीला पक्षाचे दहा राज्यांतील मुख्यमंत्री पदाधिकारी उपस्थित हाेते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती होती.
४५० सेवा ऑनलाइन
डिसेंबर २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील २९ हजार गावे फायबर अाॅप्टिकलने जाेडली जातील ही याेजना अाता ७५० गावांपर्यंत पाेहोचली अाहे. यािशवाय राज्यातील ४५० सेवा या लवकरच आॅनलाइन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुशासन हाच अजेंडा
भाजपची ही बैठक काही राजकारणाचा भाग नव्हती. त्यात केवळ सुशासनाचा अजेंडा होता. बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे मात्र गैरहजर होत्या.
बातम्या आणखी आहेत...