आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमागृहात प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवा- देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) म्हटले. फडणवीसांच्या या भूमिकेने मराठी चित्रपटांना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असता मात्र बॉलिवूडने यावर कडाडून प्रहार केला आहे.
प्राईम टाईम म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा वेळ. या वेळेत मराठी चित्रपट दाखवावेत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नवीन आदेशाप्रमाणे दादा साहेब फाळके यांच्या सन्मानार्थ एक गाणे सिनेमागृहात लावणे अनिवार्य राहणार आहे. यापूर्वी सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे आवश्यक होते.
या निर्णयाने मराठी चित्रपटसृष्टिला नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. या वेळेत सिनेमागृहांचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे असते. अशा वेळी मराठी चित्रपटांना जागा मिळाली तर त्याचा लाभ मराठी चित्रपटसृष्टीला झाल्याशिवाय राहणार नाही.
यावर बोलताना अभिनेता रितेश देखमुख म्हणाला, की बॉलिवूडचा आपण राजकारणाबाहेर ठेवायला हवे. अभिनेत्री दिप्ती नवल म्हणाल्या, की अशाने चुकीचा पायंडा पडेल. निर्माते महेश भट यांनी या निर्णयावर टीका केली आहे.