नवी दिल्ली - कोणत्याही कृषीविषयक समस्या असल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांचाच सल्ला घेतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत पवारांची भेट घेऊन साखर प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यावर खासदार राजू शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे. शेट्टी म्हणाले,साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर शिष्टमंडळ घेऊन अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटण्याचे ठरले. ऊस उत्पादकांचे प्रश्न आम्हाला चांगले ठाऊक आहेत. मात्र, फडणवीस पवारांशी सल्लामसलत करतात याला काय म्हणावे?