आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Prithviraj Chavan News In Marathi, Congress, Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री बदलाची शक्यता धूसर; पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली सोनिया गांधींची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्‍ट्रात मुख्यमंत्री बदलाची जोरदार हवा आहे. मात्र, मुख्यमंत्री बदलाची शक्यता धूसर असल्याचे समजते. तसेच काँग्रेस राज्यात निरीक्षक पाठवणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, श्रेष्ठींनी सुशीलकुमार शिंदे यांना नव्या जबाबदारीसाठी तयार राहण्यास सांगितल्याचा वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चर्चेला खतपाणी घातले आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवार) 10 जनपथवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवदान मिळाल्याचे समजते.

पृथ्वीराज चव्हाण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. नंतर पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नारायण राणेंकडूनही मुख्यमंत्री हटवण्यासाठी लॉबिंग सुरु झाल्याचे चि‍त्र आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी सोनिया गांधींच्या भेटीचा प्रयत्न केला. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी त्यांचे समर्थक आमदार उभे आहेत. त्याच्या बळावरच चव्हाण यांनी जीवदान मिळणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवार) 10 जनपथवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि चव्हाण यांच्या काय चर्चा झाली, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असून गुलाम नबी आझाद आणि ए. के. अँटनी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, ही बैठक आगामी विधानसभेचे डावपेच ठरवण्यासाठी असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे. शिंदे यांना या पदासाठी विचारणा करण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. प्रकृतीच्या कारणावरून शिंदेंनी प्रारंभी ही जबाबदारी स्वीकारण्यास अनिच्छा दर्शवली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार राहा, असा संदेश दिला असल्याचे या नेत्याने सांगितले.

दरम्यान, आझाद व अँटनी बैठकीनंतर पक्षर्शेष्ठींना अहवाल देतील. त्यानंतरच मुख्यमंत्री बदलाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण मात्र बदल होणार नसल्याबद्दल आश्वस्त आहेत. पुण्यात बोलताना ‘नेतृत्वबदलाबाबत पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे’, असे सांगून चव्हाण यांनी पक्ष देईल ती जबाबदारी सर्मथपणे सांभाळण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी स्वीकारेन- चव्हाण