आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Ministers Panel Recommends Cess On Petrol, Telecom For Swachh Bharat Abhiyan At Delhi

पेट्रोल-डिझेल, फोन बिल महागणार, स्वच्छ भारत मोहिमेसाठी अधिभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वच्छ भारत मोहिमेवर स्थापण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समूहाने दूरसंचार सेवा, पेट्रोल-डिझेल आणि खनिज पदार्थांवर अधिभार लावण्याची शिफारस केली आहे.

देशाला पाच वर्षांत स्वच्छ बनवण्यावर होणाऱ्या खर्चासाठी पैसे उभारणे हा त्यामागील उद्देश आहे. तसेच शौचालय नसलेल्या कुटुंबातील सदस्यांवर निवडणूक लढवण्यावर बंदी आणणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 15 हजार रुपयांचे अनुदान देण्याच्याही शिफारशींचा त्यात समावेश आहे. स्वच्छ भारत अधिभाराची घोषणा 2015-16 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
नीती आयोगाकडून स्थापण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या गटाची चौथी बैठक बुधवारी नवी दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात शिफारशींना अंतिम रूप देण्यात आले. समूह 10 दिवसांत अहवाल तयार करून पंतप्रधानांकडे सोपवणार आहे. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे हरीश रावत, कर्नाटकचे सिद्धरामैय्या मिझोरमचे मुख्यमंत्री ललथनवाला उपस्थित होते.