आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Trafficking Runs In Indian's Poor States

भारतातील गरीब राज्यात चालते मुलांची तस्करी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील गरीब राज्यात मोठ्याप्रमाणावर मुलांची तस्‍करी चालत असल्याचे आंतरराष्‍ट्रीय
संस्‍था व राष्‍ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वेळोवेळी प्रसिध्‍द केले आहे. आतापर्यंत भारतातून 4 लाखापेक्षा अधिक
बालकांची तस्करी झाली आहे.

बिहार,राजस्‍थान,पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश यासारख्‍या राज्यातून मुलांची तस्‍करी होत असते. कामाच्या शोधात अनेक गरीब कुटूंबे महानगरात स्थलांतर करतात. मुलांना घरी ठेवून मोठी माणसे कामांवर जातात. याचा फायदा घेऊन तस्कर मंडळी मुलांना पळवतात. पळवून आणलेल्या मुलांचा मुख्‍यत: वेश्‍याव्यवसाय ,‍भीक , पॉकेट चोरणे, अश्‍लील चित्रपट आदी गोष्‍टींसाठी वापरले जाते. निठारी प्रकरणानंतर तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री रेणुका चौधरी यांनी मानवी तस्करीबाबत ठोस पावले उचलली होती. परंतु गुन्हेगारीत कोणतीही घट झाली नाही.

लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तिंची ही तस्करी चालते.त्यांचा बेकायदेशीर धद्यांसाठी उपयोग केला जातो.महानगरात ही माणसं कामाच्या शोधात येतात. मात्र आपला तस्करीसाठी उपयोग करण्‍यात येत आहे, याची जाणीवच संबंधितांना नसते. माध्‍यमांमध्‍ये प्रसिध्‍द झालेल्या वेगवेगळ्या अहवालानुसार प्रतिवर्षी सात ते 12 कोटींचा मानव तस्करींचा व्यवसाय होत असतो.