आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी असे दिसायचे हे राजकारणी, ओळखा कोण-कोण आहेत या फोटोंमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - साधारण माणूस असो वा श्रीमंत प्रत्येकाला आपल्या बालपणाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडत असते. काही निमित्ताने किंवा सहजच प्रत्येक जण आपले बालपणीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या शालेय दिवसांतील हे फोटोज आपले समोर आले तर ओळखणे कठीण होते. 14 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (बालदिन) आहे. यानिमित्ताने DivyaMarathi.Com आपल्या वाचकांसाठी देशातील दिग्गज राजकारण्यांचे बालपणीचे फोटोज शेअर करत आहे.
 
सुषमा स्वराज
> 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणाच्या अंबाला कँटमध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला होता.
> पंजाब युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी घेणाऱ्या सुषमा स्वराज आणीबाणीच्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी जोडल्यानंतर राजकारणात आल्या.
> प्रखर वक्ता आणि कुशल राजकारणी सुषमा स्वराज या भारताच्या पहिल्या महिला विदेश मंत्री आहेत.
> त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि लोकसभेत विरोधी पक्षनेत्याही राहिलेल्या आहेत.
> सध्या त्या मध्य प्रदेशच्या विदिशामधून भाजप खासदार असून विदेश मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर राजकारणी कसे दिसत होते बालपणी...
बातम्या आणखी आहेत...