आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Accused India Over Doklam Stand Off, Says 400 Jawans Entered Chinese Territory

चीनने जारी केला 15 पानी ‘इशारा’, भारताने विनाअट मागे हटावेत सैनिक अन्यथा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनने आपल्या आरोपांसह छायाचित्र जारी केले. - Divya Marathi
चीनने आपल्या आरोपांसह छायाचित्र जारी केले.
बीजिंग- भारत व चीनमध्ये डाेकलाम सीमेवरून असलेला तणाव बुधवारी अाणखी वाढला. याबाबत चीनने प्रथमच प्रशासकीय स्तरावरून भारताला इशारा दिला अाहे. या १५पानी इशाऱ्यात भारत-चीनमधील तणाव वा संघर्ष कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी भारताने डाेकलाम सीमेवरून अापल्या सैनिकांना विनाअट मागे घ्यावे, असे म्हटले अाहे. १८ जून राेजी सुमारे २७० भारतीय सैनिक चिनी क्षेत्रातील रस्त्याचे काम राेखण्यासाठी १०० मीटरपर्यंत अात घुसले हाेते. 
 
त्यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला हाेता. तसेच जुलैअखेरीस व अातादेखील भारतीय सीमा सुरक्षा दलाचे ४०हून अधिक सैनिक व एक बुलडाेझर अवैधरीत्या चिनी क्षेत्रात घुसले असून, काेणताही स्वाभिमानी देश हा प्रकार सहन करणार नाही, असे त्यांनी या १५पानी इशाऱ्यात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...