आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China And Indian Market, Chinese Lessons For India

नरेंद्र मोदी जे करु इच्छितात ते चीनने जगभरात आधीच केले, जाणून घ्या कसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले आहे, की देश मॅन्यूफॅक्चरिंग हब झाला पाहिजे. अर्थात जगातील बाजारात 'मेड इन इंडिया' वस्तूंची चलती असली पाहिजे. चीनने भारताआधीच हे जगभरात करुन ठेवले आहे. एका आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाइटच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने भारत आणि चीनच्या उद्योगांची तुलना करताना लिहिले आहे, की एका मोठ्या उद्योगपतीने मला सांगितले, की दोन्ही देशांमध्ये उद्योगांबद्दलच्या मानसिकतेत मोठी तफावत आहे.
भारतामध्ये जेव्हा एखादी बिझनेस मिटींग असते तेव्हा सुरवातीची 40 मिनीटे गप्पांसाठी असतात आणि उरलेल्या पाच मिनीटांमध्ये बिझनेसवर चर्चा होते. तर चीनमध्ये याच्या अगदी उलट असते. हीच भारताची मोठी समस्या असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर देशाच्या पंतप्रधानांना भारतामध्ये चीन प्रमाणे सर्व वस्तूंचे उत्पादन व्हावे असे वाटत असेल तर, सर्वप्रथम आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल आणि कामाबद्दल कमिटेड राहावे लागेल.
भारताची प्रतिमा खराब
जगातील कोणत्याही देशाचे नाव घेतले, मग ते अमेरिका असेल, किंवा भारत नाही तर, आफ्रिका. आज जगातील प्रत्येक देशात 'मेड इन चायना' वस्तू मिळतात. कारण उद्योगाबाबत चीनची जगातील प्रतिमा उजवी आहे. त्यांनी उत्पादन वाढीसोबतच दर्जा देखील ठेवला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी चायनीज उत्पादनांचा ट्रेंड 3.87 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचला होता. हा आकडा चीनला जगातील बिगेस्ट ट्रेडिंग नेशन बनवितो. तर, दुसरीकडे भारताची प्रतिमा उद्योगाबाबत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रतिस्पर्धात्मक रँकिंगमध्ये जगभरात भारताचा क्रमांक 60वा आहे. या यादीत चीन 29व्या क्रमांकावर आहे. जगात लवकर उद्योग उभारण्याच्या जागतिक बँकेच्या यादीत आपण 134व्या क्रमांकावर आहोत. याचाच अर्थ जगात उद्योग सुरु करण्याचा विचार जर कोणी केला तर त्याला भारताआधी 133 पर्याय आहेत. अशा परिस्थितीत परदेशी कंपन्या कशासाठी भारतात येतील आणि कसे आपले उत्पादन वाढेल.

चीन सरकारची कामगिरी
चीन सरकारने निर्यात (एक्सपोर्ट) धोरण कसे आखले हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये एक्सपोर्टचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढविले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या आणि या लोकांचा विकास हा एक्सपोर्ट धोरणानेच होणार हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी एक्सपोर्ट वाढविण्यावर भर दिला. निर्यातदारांना त्यांनी व्हीआयपी दर्जा दिला. त्यांना कर्ज किंवा प्रकल्प उभारायचा असेल तर प्राथमिकता देण्यात आली.

चीनने निर्यात वाढविण्यासाठी निर्यातदारांना मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले. उद्योगाशी संबंधीत लोकांना दोन दिवसांमध्ये कर्ज पुरवठ्याची सुविधा देण्यात आली. मोठ्या प्रमाणात अनुदान दिले गेले. याचा अर्थव्यवस्थेवर ताण आला मात्र, सरकारने त्याची चिंता केली नाही.
चीनने जगाच्या बाजाराचा अभ्यास केला त्यानुसार उत्पादन सुरु केले. उद्योगासंबंधीच्या छोट्या - छोट्या गोष्टींवर त्यांनी लक्ष्य ठेवले. इतर देशांमध्ये एखादे उत्पादन तयार झाल्यानंतर त्यात थोडेफार बदल करुन त्याचे चीनमध्ये उत्पादन केले आणि मुळ वस्तूपेक्षा चीनी उत्पादन स्वस्त राहील याची देखील काळजी घेतली. म्हणजेच चीनने वस्तूंच्या उत्पादनाची नक्कल करण्यास सुरवात केली.
चीनने कसे केले हे ? वाचा पुढील स्लाइडमध्ये...